दि कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांचा संयुक्त विद्यमाने वाय डी माने कॅम्पस येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बचत प्रेरणा या विषयावर मार्गदर्शन आयोजित केले होते. या कार्यक्रमास कागल सब पोस्टमास्टर सौ. एस एस आऊंधकर मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी संस्थेच्या प्रशासकीय अधिष्ठाता सौ. शिल्पा पाटील, बी.एड् प्राचार्या डॉ.लकाडे, डी. एड् प्राचार्य श्री. संकपाळ, फार्मसी प्राचार्य डॉ.सचिन माळी, नर्सिंग प्राचार्या सौ. सरिता खामकर, सी बी एस ई प्राचार्या सौ.शुभांगी पवार उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नियोजन आय. टी. आय.प्राचार्या सौ. कोमल धनवडे यांनी केले. या कार्यक्रमास सर्व विभागाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.