“व्यक्तिमत्व विकास” या विषयावर प्रबोधनात्मक मार्गदर्शन संपन्न

दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित,वाय.डी.माने इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी प्रायव्हेट आय.टी.आय., कागल येथे आज दिनांक 18 नोव्हेंबर 2024 रोजी मूल्य व तंत्रशिक्षण, पर्यावरण शिक्षणातून व्यक्तिमत्व विकास या विषयावरील मार्गदर्शन संपन्न झाले झाले. यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी श्री शिवाजी नेर्ली सर यांची प्रमुख उपस्थिती होती.त्यांनी विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण, तंत्रशिक्षण आणि पर्यावरण यांची सांगड घालून स्वतःचा व्यक्तिमत्व विकास घडवून कसा आणावा याबद्दल मार्गदर्शन केले.यासाठी प्राचार्य श्री अवधूत पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच बरोबर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व कार्यक्रमाचे आभार श्री.भास्कर सर यांनी मांडले.यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

जागतिक नशामुक्ती प्रबोधनात्मक मार्गदर्शन

दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित, वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी प्रायव्हेट आय.टी.आय.,कागल येथे सोमवार दिनांक 26 जून 2023 रोजी साजरा होणाऱ्या जागतिक नशामुक्ती दिनाचे औचित्य साधून आज दिनांक 24 जुन 2023 रोजी विद्यार्थ्यांना प्रबोधनात्मक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी नशेमुळे,व्यसनाधीनता यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, आर्थिक आणि सामाजिक नुकसान या बद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न मार्गदर्शक यांनी केला. संस्थेचे प्राचार्य,उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थी यांनी व्यसनापासून दूर राहण्याची प्रतिज्ञा केली. या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

इंटरव्यू टेक्निक्स आणि सॉफ्ट स्किल

दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित वाय.डी.माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आय टी आय) कागल यांच्या मार्फत आज दि ७ मे २०२२ रोजी  कॉलेजमध्ये  इंटरव्यू टेक्निक्स आणि सॉफ्ट स्किल  या विषयावर आयोजित   मार्गदर्शन यशस्वीरित्या संपन्न झाले. यासाठी ब्रेनी टेक्नॉलॉजी, कोल्हापूरचे  श्री. कल्लाप्पा धनगर सर आणि  श्री. विजय बागे सर  यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले .यावेळी आय. टी. आयचे सर्व विद्यार्थी आणि स्टाफ उपस्थित होता. यासाठी प्राचार्य श्री. अवधूत पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले.