शत्रुसंधो विश्लेषण (SWOT Analysis) कार्यशाळा संपन्न

दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित, वाय डी मानेइन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी प्रायव्हेट आय.टी.आय., कागल येथे एम्प्लॉयबिलिटी स्किल या विषया अंतर्गत शत्रुसंधो विश्लेषण (SWOT Analysis) कार्यशाळा आज दि.28/10/2024 पार पडली. विद्यार्थ्यांना या विश्लेषणाअंतर्गत येणाऱ्या सामर्थ्य, कमकुवतपणा, संधी आणि अडथळ्यांबाबत माहिती देण्यात आली. तसेच विविध उदाहरणांच्या साहाय्याने स्वतःचे विश्लेषण कसे करावे याचे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्राचार्य श्री अवधूत पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास प्रथम वर्षातील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.
खंडेनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

वाय.डी.माने इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी प्रायव्हेट आय.टी.आय. कागल येथे आज दि. १२ ऑक्टबर २०२४ रोजी दरवर्षीप्रमाणे यंदाही आय.टी.आय.चा प्रमुख उत्सव खंडे महानवमी मोठया प्रमाणात साजरा करण्यात आला.सर्व विभागामधील साहित्यांचे भक्तिभावाने पूजन करुन उत्साहात कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमासाठी कॉलेजचे प्राचार्य श्री.अवधुत पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
खंडेमहानवमीनिमित्त “वर्ग सजावट स्पर्धा” संपन्न

दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित वाय.डी. माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी प्रायव्हेट आयटीआय कागल येथे खंडे महानवमीनिमित्त आयोजित वर्ग सजावट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.या स्पर्धेत फिटर, इलेक्ट्रिशन आणि ड्राफ्ट्समन सिव्हील या विभागामध्ये ही स्पर्धा पार पडली. सर्व विद्यार्थ्यांनी आप आपला विभाग सजवण्यासाठी मेहनत घेऊन या स्पर्धेत भाग घेतला.या स्पर्धेसाठी ए.डी.माने इंटरनॅशनल अकॅडमीचे प्राचार्य श्री.सासमिले सर यांनी परीक्षक म्हणून सहकार्य केले. या संपूर्ण स्पर्धेसाठी आयटीआयचे प्राचार्य श्री अवधूत पाटील सर यांचे मार्गदर्शन मिळाले.या स्पर्धेवेळी सर्व विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
“एक तास श्रमदान स्वच्छता मोहीम”

दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित, वाय डी माने इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी आय.टी.आय.येथे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक 01 ऑक्टोंबर 2024 रोजी आय.टी.आय व आय.टी.आय.च्या परिसरातील स्वच्छता सर्व विद्यार्थ्यांकडुन करण्यात आली.तसेच कार्यक्रमाची सांगता प्राचार्य श्री अवधूत पाटील सर यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या फोटोचे पूजन करुन करण्यात आले.यावेळी सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
“फायर सेफ्टीचे प्रात्यक्षिक सादर”

दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित वाय डी माने इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, आय.टी.आय., येथे दि. 19 सप्टेंबर 2024 रोजी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षितता अभ्यासक्रमातील आगीपासून संरक्षणाचे (फायर सेफ्टी) प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यावेळी एबीसी टाइप CO2 ड्राय पावडर आणि फायर बकेटच्या साहाय्याने आगीवर कसे नियंत्रण मिळवावे याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखविले. तसेच आगीचे प्रकार आणि त्यावर नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या Fire Extinguisher चे प्रकार याबद्दल माहिती देण्यात आली.यावेळी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
“75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा”
दि कागल एज्युकेशन सोसायटीच्या वाय डी माने कॅम्पस मध्ये 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. एम. आय. मोमीन मॅडम या उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव श्री प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने सर, कॅम्पस डायरेक्टर सौ शिल्पा पाटील मॅडम, सर्व युनिटचे प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमावेळी ए.डी.माने इंटरनॅशनल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी ध्वजगीत आणि राष्ट्रभक्तीपर हे गीत सादर केले तसेच आयटीआय च्या विद्यार्थ्यांनी संचलन सादर केले.यावेळी प्रत्येक युनिटमधील बेस्ट आउटगोइंग स्टुडन्ट यांना गौरविण्यात आले. त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. कॅम्पस डायरेक्टर सौ शिल्पा पाटील मॅडम यांनी आभार मानले. व कार्यक्रमाची सांगता झाली.सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष श्री सुनील माने सर आणि संस्थेचे संचालक श्री बिपिन माने सर यांचे मार्गदर्शन लाभले.
शिक्षक दिन साजरा

दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित,वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी प्राय.आयटीआय येथे आज दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी राष्ट्रीय शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारताचे द्वितीय राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिक्षक दिनाचे महत्त्व विशद करण्यात आले. यानंतर विद्यार्थी शिक्षक म्हणून संकल्प जाधव, सिद्धार्थ कांबळे, अक्षता पवार, विघ्नेश घुले, वरून वरांबळे, विराज सावेकर, सिद्धांत कुंभार, आदित्य बिलकर या विद्यार्थ्यांनी कॉलेजचे कामकाज पाहीले आणि सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांनप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाचे संयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री कोळी सर यांनी केले. यासाठी प्राचार्य श्री अवधूत पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत

दि. ०२/०९/२०२४ रोजी वाय. डी. माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी प्रायव्हेट आयटीआय कागल या आयटीआय मध्ये सन २०२४-२५ मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी आय.टी.आय. चे प्राचार्य श्री.अवधूत पाटील सर यांनी नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच श्री.भास्कर सर यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची ओळख करून दिली.यावेळी आय.टी.आय चे शिक्षक वृंद उपस्थित होता. तसेच प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“राष्ट्रीय अभियंता दिन” साजरा

दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित, वाय.डी.माने आय.टी.आय. येथे दरवर्षीप्रमाणे दिनांक 15 सप्टेंबर रोजी भारताचे महान अभियंता शास्त्रज्ञ सर विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय अभियंता दिन आज दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी फोटो पूजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्राचार्य श्री अवधूत पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
“लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन”

१०० सेकंद कृतज्ञतेचे..
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीदिन निमित्ताने शनिवार दि. ६ मे रोजी सकाळी १० वाजता वाय. डी.माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आय.टी.आय.)कॉलेज च्या परिसरात १०० सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले. तसेच शाहू महाराजांच्या कार्याला उजाळा देण्यात आला .यावेळी सर्व विद्यार्थी, स्टाफ आणि प्राचार्य उपस्थित होते..
वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आय. टी.आय. यांच्या तर्फे वृक्षारोपण:-

दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित,वाय.डी.माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी प्रायव्हेट आय.टी.आय.,कागल यांच्या तर्फे अलका शेती फार्म परिसर येथे आज दि.22 जून 2024 रोजी संस्थेचे उपाध्यक्ष श्री सुनील माने सर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.संस्थेचे सेक्रेटरी भैया ऊर्फ प्रताप माने सर, शालेय समितीचे अध्यक्ष बिपिन माने सर व कॅम्पस संचालिका पाटील मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.या उपक्रमासाठी प्राचार्य पाटील सर,कृषी तंत्र विद्यालय मधील भोसले सर तसेच सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
जागतिक नशामुक्ती दिनानिमत्ताने मार्गदर्शन संपन्न

👉🏻दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित, वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी प्रायव्हेट आय.टी.आय.,कागल येथे नवजीवन निवासी व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र कागल आणि आय.टी.आय. च्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 26 जून 2024 रोजी साजरा होणाऱ्या जागतिक नशामुक्ती दिनाचे औचित्य साधून आज दिनांक 25 जुन 2024 रोजी विद्यार्थ्यांना प्रबोधनात्मक मार्गदर्शन पर सत्र यशस्वीरित्या संपन्न झाले. प्रथम अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक श्री रोहित पाटोळे सर यांनी केले. मानसतज्ञ श्री.अक्षय साळुंखे सर यांनी बदलती जीवनशैली आणि वाढते व्यसनाचे प्रमाण याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.सचिन हिरेमठ सर यांनी व्यसनमुक्ती केंद्र विषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे स्वागत आणि सूत्रसंचालन श्री. अभिजीत पाटील सर आणि आभार श्री. मोहन भास्कर सर यांनी मांडले. या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
“जागतिक योग दिन”

दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित, वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी प्रायव्हेट आय.टी.आय.,कागल येथे शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.यावेळी योग दिनाचे महत्त्व विशद करत योग दिन साजरा करण्यामागचे कारण विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.विद्यार्थ्यांनी योगासनाचे प्रकार आणि ध्यानधारणा करून योग दिन साजरा केला.या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शैक्षणिक अभ्यासक्रम मधील On Job Training

दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित, वाय.डी.माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी प्रायव्हेट आय.टी.आय., कागल
Fiter व Electrician प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक अभ्यासक्रम मधील On Job Training आयोजित केलेले आहे.विद्यार्थ्यांना Industry मधील प्रॅक्टिकल समजण्यासाठी तसेच Training च्या दृष्टीने खालील Industry मध्ये विद्यार्थ्यांची ट्रेनिंग साठी नेमणूक केलेली आहे.
● सेफ सील मशीन प्रायव्हेट लिमिटेड, कागल.
● मेट्रो हायकास्ट स्पिनिंग मिल, कागल.
● एल कॉम इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड,कागल.
● कदम सोलार एनर्जी, कोगनोळी.
● शार्प इलेक्ट्रिकल, गोकुळ शिरगाव.
● विकी रेफ्रिजरेटर,कागल.
● स्प्रिंग टेक्नॉलॉजी, गोकुळ शिरगाव.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित, वाय.डी.माने आय.टी.आय. मध्ये कागल एज्युकेशन सोसायटी संचलित, वाय.डी.माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी प्रायव्हेट आय.टी.आय., कागल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या संविधान, सामाजिक न्याय व समतेच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या संघर्ष याबद्दल माहिती देण्यात आली. यासाठी प्राचार्य श्री.अवधूत पाटील सर यांचे मार्गदर्शन लागले.यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कागल संस्थेचे संस्थापक,शिक्षणमहर्षी कै. वाय.डी.माने (अण्णा) यांची १८ व्या स्मृतिदिनी

दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित वाय. डी. माने इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी (आय.टी.आय.) कागल यांच्यावतीने कागल संस्थेचे संस्थापक,शिक्षणमहर्षी कै. वाय.डी.माने (अण्णा) यांची १८ व्या स्मृतिदिनी निमित्ताने प्रतिमापूजन करण्यात आले.तसेच सर्व विद्यार्थ्यांना अण्णांच्या विषयी माहिती सांगण्यात आली.त्याचबरोबर आपल्या कॅम्पस मधील मैदान व आयटीआय परिसरातील स्वच्छता मोहीम राबवून श्रमदानातून अभिवादन करण्यात आले.
“जागतिक महिला दिन”

दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित वाय.डी.माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी प्रायव्हेट आय.टी.आय कागल येथे आज 7 मार्च रोजी 8 मार्च रोजी होणारा “जागतिक महिला दिन” साजरा करण्यात आला.सर्व विद्यार्थ्यांना महिला दिनाबद्दल सर्व माहिती निदेशक भास्कर सर यांनी सांगितली.त्याचबरोबर आय टी आय ऑफिस विभागातील अकाउंटंट सौ.ज्योत्स्ना डवरी मॅडम यांचा सन्मान प्राचार्य अवधूत पाटील सर यांच्या हस्ते व प्रथम वर्ष ड्राफ्ट्समन सिव्हिल विभागातील विद्यार्थिनी अक्षता पवार हिचा सन्मान वर्गशिक्षक खोत सर यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाची सांगता आभार मानून झाली सर्वांचे आभार निदेशक कोळी सर यांनी मानले.यावेळी आय.टी.आय.चे प्राचार्य, सर्व स्टाफ आणि विद्यार्थी उपस्थित होते.
संत गाडगेबाबा जयंती साजरी

छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन

दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित, वाय.डी.माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी प्रायव्हेट आय.टी.आय., कागल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेती विषयक, प्रशासन आणि स्त्रियांबद्दल आदर व्यक्त करण्याच्या गुण आणि नियमांची माहिती देण्यात आली यासाठी प्राचार्य श्री.अवधूत पाटील सर यांचे मार्गदर्शन लागले.
यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
वार्षिक क्रीडा महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित, वाय.डी.माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी प्रायव्हेट आय.टी.आय., कागल येथे वार्षिक क्रीडा महोत्सव दि.29 ते 31 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ आज दि.19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंतीचे औचित्य साधून घेण्यात आला. या क्रीडा महोत्सवात एकतेचे महत्व दर्शवणारे क्रिकेट, खो-खो, कबड्डी, रिले, व्हॉलीबॉल या सांघिक खेळाबरोबरच एकात्मक विकास साधणाऱ्या कॅरम, बुद्धिबळ, भालाफेक, गोळा फेक, 100 मीटर रनिंग या वैयक्तिक खेळांचा सहभाग होता. या सर्व खेळातील विजेत्यांना आणि उपविजेत्यांना शिल्ड व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती

दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित, वाय.डी.माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी प्रायव्हेट आय. टी.आय,कागल येथे आज दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याबद्दल माहिती सांगण्यात आली.
तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले १९३ व्या जयंती

दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित, वाय.डी.माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी प्रायव्हेट आय. टी.आय,कागल येथे आज दि.०३ जानेवारी २०२४रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच यांच्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यात आली.यावेळी सर्व विद्यार्थी आणि स्टाफ उपस्थित होते.
खंडे नवमी उत्सव उत्साहात साजरी


वाय.डी.माने इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी प्रायव्हेट आय.टी.आय. कागल येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही आय.टी.आय.चा प्रमुख उत्सव खंडेनवमी मोठया प्रमाणात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक श्री. बिपिन माने सर आणि वाय. डी. माने कॅम्पसच्या संचालिका सौ. शिल्पा पाटील मॅडम उपस्थीत होत्या. त्यांच्या हस्ते प्रतिमा आणि साहित्य पूजन करण्यात येऊन श्रीफळ वाढवन्यात आले. यानंतर त्यांनी ड्राफ्ट्समन सिव्हिल या ट्रेड च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर प्रेझेंटेशनचे उद्घाटन केले. सर्व डिपार्टमेंमध्ये पाहुण्यांच्या हस्ते सर्व उपकरणांचे पूजन करण्यात आले व कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून श्री.कोळी सर यांनी काम पाहिले. यासाठी प्राचार्य श्री.अवधुत पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते
कॉविड १९ लसिकरण उपक्रम

उपक्रमाचे नाव : कॉविड १९ लसिकरण उपक्रम
समन्वयकाचे नाव : श्री . अभिजीत खाबडे
- उपक्रमाची तारीख :०७/०१/२०२२
- मान्यवरांचे नाव : मुख्य वैद्यकीय अधिकारी, कागल
- उपस्थितांचे नाव : १.प्राचार्य श्री.अवधूत पाटील सर
- सहभागी : सर्व विद्यार्थी वर्ग आणि शिक्षक व शिक्षोत्तर कर्मचारी
- उपक्रमाचा तपशील :
दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक व आय.टी.आय. ) कागल येथे दि. ०७/०१/२०२२ रोजी संस्थेचे सेक्रेटरी श्री प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण उपकरण घेण्यात आला .यावेळी मुख्य वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, कागल यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी प्राचार्य श्री.अवधूत पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मान्यवरांचे स्वागत व आभार श्री खाबडे सर यांनी मानले. यावेळी सर्व विद्यार्थी आणि स्टाफ उपस्थित होता.