“मधु कमल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, कागल” या ठिकाणी औद्योगिक भेट

 दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित,
वाय.डी.माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी प्रायव्हेट आय. टी.आय,कागल यांनी आज दि १५ डिसेंबर २०२३ रोजी “Draughtsman Civil” या विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी मधु कमल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कागल या ठिकाणी आयोजित केलेली औद्योगिक भेट (Industrial Visit) यशस्वीरित्या संपन्न झाली.  प्रथम विद्यार्थ्यांना कंस्ट्रक्शन ची सुरुवात करताना काय करावे ह्याची संपूर्ण माहिती दिली.Site Clining, line out, excavation, PCC ,Column Centre line point, Slab beam, Plinth beam, Slab, Starter column, Plastering कसे करावे याची सर्व माहिती तसेच साइट वर प्रत्यक्ष दाखविले. औद्योगिक भेट यशस्वी करण्यासाठी सुपरवाइजर अक्षय माथे सर विशेष सहकार्य लाभले. यावेळी सर्व विद्यार्थी आणि स्टाफ उपस्थित होते,यासाठी प्राचार्य श्री. अवधूत पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले.

“श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना, लि.कागल” या ठिकाणी औद्योगिक भेट

दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित,
वाय.डी.माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी प्रायव्हेट आय. टी.आय,कागल यांनी आज दि १५ डिसेंबर २०२३ रोजी “फिटर आणि इलेक्ट्रिशियन” या विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना, लि.कागल या ठिकाणी आयोजित केलेली औद्योगिक भेट (Industrial Visit) यशस्वीरित्या संपन्न झाली.  ऊस गाळप यंत्रणा, त्यासाठी लागणाऱ्या मशिनरी, त्यांची देखभाल (Maintenance) याची माहिती देण्यात आली.”Boiler, Cooling System, Turbine, Generator” असे विविध यंत्र सामुग्री दाखवण्यात आली. या भेटीमध्ये विद्यार्थ्यांना कारखान्यात ऊसावर होणाऱ्या सर्व प्रक्रिया दाखविण्यात आल्या.औद्योगिक भेट यशस्वी करण्यासाठी कारखान्याच्या अधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले .यावेळी सर्व विद्यार्थी आणि स्टाफ उपस्थित होते. यासाठी प्राचार्य श्री. अवधूत पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले.

“पराग इंडस्ट्रीज गोकुळ शिरगाव आणि स्टील टास्क इंडस्ट्रीज” या ठिकाणी औद्योगिक भेट

दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित वाय.डी.माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आय टी आय) कागल यांच्या मार्फत आज दि २० एप्रिल २०२२ रोजी पराग इंडस्ट्रीज गोकुळ शिरगाव आणि स्टील टास्क इंडस्ट्रीज या ठिकाणी फिटर या विभागाच्या  विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली Industrial Visit यशस्वीरित्या संपन्न झाली. Visit यशस्वी करण्यासाठी  इंडस्ट्रीजच्या अधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी तेथील कंपनी मध्ये सर्व CNC व VMC MACHINE दाखवण्यात आल्या व त्यामधील होणार्या सर्व हालचाली आणि क्रिया दाखवण्यात आल्या . जॉब कसा लावतात कसा बसवतात आणि त्याच्यावर क्रिया कशी  होते हे दाखवण्यात आले , जॉब चेच्किंग कसा केला जातो आणि कोणती साहित्य  चेक करायला वापरतात हे देखील दाखवले गेले , सुरवातीचा जॉब आणि सराव प्रक्रिया केल्यानंतर चा जॉब या मधील फरक दाखवून सांगण्यात आले . तसेच GRINDING मशीन देखील दाखवण्यात आले आणि त्याची क्रिया पण करून दाखवली , SPM मशीन देखील दाखवले गेले . SHEET METAL कंपनी मध्ये देखील शीट कापण्यापासून ते त्याला बेंड कसा करतात आणि CO2 वेल्डिंग व TIG आणि ऑर्गन वेल्डिंग देखील प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले .यावेळी फिटर विभागाचे सर्व विद्यार्थी आणि स्टाफ उपस्थित होता. यासाठी प्राचार्य श्री अवधूत पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले.