“वाय.डी.माने आयटीआय येथे आयोजित कॅम्पस इंटरव्यू मधून 50+ विद्यार्थ्यांची निवड 2024”

दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित वाय. डी. माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (खाजगी) औद्योगिक प्रशिक्षण संस्था,कागल येथे दि 23 जुलै रोजी शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या वतीने आयोजित केलेला कॅम्पस इंटरव्यू संपन्न झाला.यामध्ये एमीकेज फाऊंडर्स, कागल सेफ स्टील मशीन प्रायव्हेट लिमिटेड कागल,शार्प इलेक्ट्रिकल,किर्लोस्कर ऑइल इंजिन कागल(T.P),शारदा इलेक्ट्रिकल,विद्युत इंजिनियर या कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यामध्ये ५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड झाली कॅम्पस इंटरव्यूद्वारे प्लेसमेंट झाली.हा उपक्रम राबवण्यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे कॉर्डिनेटर श्री अक्षय कामते यांनी विशेष परिश्रम घेतले. व प्राचार्य श्री अवधूत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.संस्थेचे सेक्रेटरी प्रताप उर्फ भैय्या माने,संस्थेचे विश्वस्त श्री बिपिन माने ,कॅम्पस संचालिका सौ शिल्पा पाटील सर्व उपस्थित होते

“वाय.डी.माने आयटीआय येथे आयोजित कॅम्पस इंटरव्यू मधून 30+ विद्यार्थ्यांची निवड 2023”

वाय.डी.माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (खाजगी) औद्योगिक प्रशिक्षण संस्था,कागल येथे आज दि. २४ मे २०२२ रोजी शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या वतीने आयोजित केलेला कॅम्पस इंटरव्ह्यू संपन्न झाला.यामध्ये कस्तुरी इंडस्ट्रीज कागल, घाटगे पाटील इंडस्ट्रीज कागल, मार्व्हलस ग्रुप,कोल्हापूर, न्यू मेल्टिंग सेंटर, कोल्हापूर,इल्कॉम इंटरनॅशनल प्रा. लि. कागल,इंटिग्रेटेड एनर्जी इंजिनिअरिंग कागल,एमीकेज फाऊंडर्स कोल्हापूर आणि या कंपनीज सहभागी झाल्या होत्या. आय.टी.आयच्या शेवटच्या वर्षातील 30+ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे प्लेसमेंट झाली. कॅम्पस इंटरव्ह्यू यशस्वी करण्यासाठी या कंपन्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हा उपक्रम राबवण्यासाठी सर्व स्टाफ,ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे कोऑर्डिनेटर श्री कामते सर आणि प्राचार्य श्री अवधूत पाटील सर यांनी विशेष मेहनत घेतली. सर्व उपक्रमासाठी संस्थेचे सेक्रेटरी भैय्यासोा माने सर,संस्थेचे संचालक श्री बिपिन माने सर,संस्थेच्या ॲडमिन आणि एचआर सौ. शिल्पा पाटील मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.